Featured

प्रेक्षकांना पसंत पडला ठाकरे सिनेमाचा ट्रेलर, पण खटकली ही बाब

हिंदी भाषेत रिलीज झालेल्या ट्रेलरला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आवाज आहे. तर मराठी भाषेतील ट्रेलर आणि सिनेमाला सचिन खेडेकर बाळसाहेबांचा बनले आहेत.

पण यावर मात्र अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांचा धारदार आवाज या सिनेमात मिसिंग असल्याची तक्रार अनेकांनी बोलून दाखवली.

बाळासाहेब आणि सचिन यांच्या आवाजात संवादशैलीत कोणतंही साम्य नसल्याने बाळासाहेबांच्या आवाजाचा फिल संपूर्ण ट्रेलरभर मिसिंग राहतो. त्यामुळेच बाळासाहेबांच्या मूळ आवाजाला न्याय देईल असा आवाज सिनेमात वापरण्याची मागणी रसिकांकडून केली जात आहे. आता दिग्दर्शक आणि निर्माते या मागणीला न्याय देतात का ते पाहू.

Advertisements

पुष्की, प्रार्थना आणि सोनालीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चा पाहा ट्रेलर

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहण्यास आतुर झाले होते. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मिडीयावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आणि खास प्रेक्षकांसाठी नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे.

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. ‘ती’ कोण? आणि मग ‘ती’ कोणाची आहे? अशाप्रकारे पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मिळालीच असतील. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. अशीच गोष्ट आहे अनयची (पुष्कर जोग) आणि त्याच्या आयुष्यातील दोन मुली म्हणजे सई आणि प्रियांका. प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकेची हिंट मिळाल्यामुळे या प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमध्ये त्यांची नेक्स्ट स्टेप काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता देखील नक्की वाढणार. या ट्रेलरमधून एक सरप्राईज प्रेक्षकांना मिळालं आणि ते म्हणजे सिध्दार्थ चांदेकर या सिनेमात छोटीशी भूमिका साकारतोय.

या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. सिनेमाचे चित्रीकरण इतके सुरेख, सुंदर झाले आहे की पाहता क्षणीच प्रेक्षक नक्कीच सिनेमाच्या प्रेमात पडतील आणि याचे श्रेय मृणाल यांना जाते. बॅकग्राऊंड म्युझिक, गाणं या गोष्टी देखील कुतुहल वाढवत आहेत. ही एक हलकी-फुलकी, रोमँटिक कॉमेडी कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे असून आताची जनरेशन या सिनेमाचा पुरेपूर आनंद लुटतील याचा अंदाज या इंटरेस्टिंग ट्रेलरवरुन बांधता येऊ शकतो.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, वैशाल शाह, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. राहुल हकसर हे या सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर आहेत तर हा सिनेमा रजत एंटरप्राईझ नेशनवाईड रिलीझ करणार आहेत.

भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती & ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

पाहा दीप-वीरच्या लग्नाचा अल्बम

आता दीप-वीर हे बॉलिवूडचं लाडकं कपल आपल्या रितीरिवाजानुसार आणाभाका घेत आयुष्भरासाठी एकमेकांचे झाले.

Deepika Ranveer Wedding Photos
Deepika Ranveer Wedding Photos

दीपिका आणि रणवीर या बॉलिवूडच्या बाजीराव आणि मस्तानीने सातासमुद्रापार इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी लग्नगाठ बांधली. फक्त जवळचे नातेवाईका आणि काही मित्र यांनाच त्यांच्या इटलीतील या स्वप्नवत लग्नसोहळ्याचे खास निमंत्रण होते.

दीप-वीर 14 नोव्हेंबरला कोंकणी रितीरिवाजानुसार विवाहबध्द झाले तर 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी या बॉलिवूड कपलने सिंधी पध्दतीने विवाह केला . कोंकणी लग्नाची व्हाईट ही थीम वर-वधू आणि इतर व-हाडी मंडळींसाठी ठेवण्यात आली होती. तर 15 नोव्हेंबरला होणा-या विवाह सोहळ्यासाठी लाल ही थीम ठेवण्यात आली.

deepikapadukone.jpg

आपल्या  या बॅण्ड बाजा बारातसाठी दीप-वीरने शाही व्यवस्था केली.

deepikapadukone1.jpg

नववधू दीपिका पादुकोणचं सौंदर्य खुप खुललं होतं.

deepikapadukone2.jpg

आता दीप-वीर हे बॉलिवूडचं लाडकं कपल आपल्या रितीरिवाजानुसार आणाभाका घेत आयुष्भरासाठी एकमेकांचे झाले.

deepika-ranveer-album.jpg

लग्नातील खास फोटोसुध्दा बाहेर व्हायरल होऊ नयेत म्हणून कडेकोट व्यवस्था करण्यात आली. लग्नस्थळी जागोजागी जॅमर्स व ड्रोनवर बंदी घातल्यानंतर त्यांनी पाहुण्यांच्या मोबाईल फोनवरसुध्दा स्टिकर्स लावले होते. फक्त बॉलिवूड आणि चाहतेच नाही तर अवघ्या जगाला दीप-वीरच्या लग्नातले ते सुरेख आणि अविस्मरणीय क्षण पाहण्याची घाई झाली. चाहते त्यांच्या लग्नातील फोटोंची चातकासारखी वाट पाहात होते. पण अखेर 15 नोव्हेंबरला दीप-वीर यांनी आपल्या लग्नातील फोटो सोशल मिीयावर चाहत्यांसोबत शेअर केले.